औषधाविषयी
प्रत्येक मनुष्याला स्वतां औषधीशास्त्र समजावें हेच उत्तम. आत्मज्ञाना-पेक्षांहि ह्या शास्त्राच्या ज्ञानाची आवश्यकता जास्त आहे. पण आत्मज्ञान मिळविण्याची मनुष्ये जितकी खटपट करतात तिच्या शतांशहि औषधिज्ञान मिळविण्याची खटपट मनुष्ये करीत नाहीत. फार काय सांगावें, तज्ज्ञ डॉक्टर म्हणविणारेहि जशी खटपट करावी तशी करीत नाहीत. तशी त्यांनी खटपट केली असती तर आलोपथी, होमिओ-पथी, नेचरोपथी, हकीमी अशी अनेक औषधीशास्त्रे न …